नाशिकमध्ये दोन अपघातांत “इतक्या” जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : शहर परिसरात काल (दि. १८) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन जण ठार झाले आहेत.

अपघाताचा पहिला प्रकार आडगाव शिवारात घडला. या प्रकरणी पोलीस हवालदार संजय डापसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की कृष्णकुमार रामजनम चौहान (वय २१, रा. पडरईय्या, ता. हरैय्या, उत्तर प्रदेश) हा दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा हायवेने नाशिककडून ओझरकडे पायी जात होता. त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाने त्याला जबर धडक दिली. त्यात चौहान हा गंभीर जखमी झाला. त्याला औषधोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यादरम्यान त्याचा काल रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत एक्स्लो पॉईंट येथून रस्त्याने पायी जाणार्‍या ४० वर्षीय अज्ञात इसमास २४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाने जबर धडक मारल्याने हा इसम गंभीर जखमी झाला होता. त्याला औषधोपचारासाठी १०८ अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना डॉक्टरांनी तपासून त्याला काल मयत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!