नाशिक :– सन 2022-2025 या कालावधीसाठी सोहिल शाह यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राकेश परदेशी, सचिवपदी संजीवन तांबूळवाडीकर, खजिनदारपदी जितेंद्र फाफट व अभिजित मोदी यांची विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीएआय भवन येथे निवडणुक जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आली होती. यात निवडून आलेल्या सदस्यांमधून ही निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारिणीचे मावळते अध्यक्ष राजेंद्र शेटे व माजी अध्यक्ष रोहन आंधळे, हर्षल सुराणा व पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषद सदस्य पियुष चांडक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यकारणी सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे स्वागत केले. याच बरोबर मावळते अध्यक्ष राजेंद्र शेटे यांनी आपल्या पदाचा पदभार नवनिर्वाचित कार्यकारणीस सोपविला व नाशिक शाखेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.