वीर जवान रंगनाथ पवार यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

 

निफाड (चेतन बोरगुडे) :- अनेक दिवसानंतर दोन दिवसांनी मुलगा घरी येणार असल्याचा आनंद कुटूंबातील आई, वडील, पत्नी, भाऊ, मुले, मित्र परिवार व्यक्त करत असतांना अचानक आपल्या मुलाला सीमेवर वीरमरण आल्याची बातमी वाऱ्या सारखी पंचक्रोशीत येऊन धडकली आणि सर्वांचे डोळे पाणवले.

निफाड तालुक्यातील महाजनपुर येथील जवान रंगनाथ वामन पवार हे राजस्थानमधील बडणारे सीमेवर सेवा बजावत असतांना अचानक छातीत कळ येऊन त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसानंतर महाजनपूर या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी निफाड तालुक्यातील अधिकारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी शोकाकुल वातावरणात मुलगा सूरज याने अग्निदाग दिला

कुटुंबात अठरा विश्व दारिद्र्य, अशिक्षित आईवडील, लहान भाऊ बहीण यांना सांभाळण्याची जबाबदारी लहानपणी रंगनाथ यांच्यावर पडली. मात्र शरीराने धिप्पाड, प्रचंड मेहनती, हुशार असल्यामुळे बारावी शिक्षण झाल्यानंतर लगेच शासकीय सेवेत नोकरी मिळावी म्हणून संरक्षण दलात नोकरींला सुरुवात केली. बॉर्डर सिक्यूरीटी फोर्स मध्ये सेवा करत हवालदार पदाला गवसणी घातली.

त्रिपुरा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, नागालँड, आसाम, राजस्थान या राज्यातील सीमेवर देशसेवा केली. जवळपास 23 वर्ष सेवा केली. एक वर्षांने सेवानिवृत्त होणार होते. त्यानंतर घरी येऊन कुटुंबासोबत रहाणार असल्याचे स्वप्न उराशी बाळगून असतांना अचानक सीमेवर ड्युटी करत असतांना छातीत दुखायला लागले आणि उपचार करण्याअगोदर त्यांना विरमरण आले. त्यांचे पार्थिव राजस्थान वरून पुणे पर्यंत विमानाने तर पुण्यापासून घरापर्यंत शासकीय गाडीत आणण्यात आले.

यावेळी माजी आमदार अनिल कदम, तहसीलदार शरद घोरपडे, पोलीस सहाय्यक निरीक्षक पी. वाय. कादरी, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, कमांडो धनंजय वीर, डॉ. सारिका डेर्ले, खंडू बोडके, जगन कुटे , दिगंबर गिते, भाऊ विलास आईवडील, पत्नी, दोन मुले, बहीण यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी निफाड तालुक्यातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!