नवी दिल्ली :- क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियन शेन वॉर्न त्यांच्या घरात बेशुद्धावस्थेत सापडले. अनेक क्रिकेटरांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वीरेंद्र सेहवागनेही ट्वीट करून शेन वॉर्नच्या निधनानंतर आपली भावना व्यक्त केली आहे.
वॉर्नच्या व्यवस्थापनाने याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई बेटावर होता एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी हा दुसरा धक्का आहे. रॉड मार्शच यांचेही गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शुक्रवारी निधन झाले होते. शेन वॉर्नने क्रिकेटपटू मार्शच्या निधनावर शोक व्यक्त केला होता.