IPL 2022 : अहमदाबाद संघाचे नाव ठरलं; ‘या’ नावाने ओळखली जाणार हार्दिक पंड्याची टीम

मुंबई । भ्रमर वृत्तसेवा : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2022) 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊची टीम नव्याने मैदानात उतरणार आहे. यातल्या लखनऊ टीमचे नाव आधीच जाहीर करण्यात आले असून आता अहमदाबादच्या टीमचेही नाव समोर आले आहे.
लखनऊ संघाचे नाव लखनऊ सुपरजायंट्स असे असून केएल राहुल या संघाचा कर्णधार आहे. तर हार्दिक पंड्या अहमदाबाद संघांचे नेतृत्व करणार असून हार्दिकसोबत राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रेंचायझीचा भाग असणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादच्या टीमचे नाव अहमदाबाद टायटन्स (Ahmedabad Titans) असे असल्याची माहिती समोर आली असून याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या कोचिंग स्टाफचीही निवड केली आहे. त्यांनी आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांना सोबत घेतले आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा माजी फलंदाज विक्रम सोलंकीला संघ संचालक बनवण्यात आले आहे. तर अहमदाबाद फ्रेंचायझीची मालकी CVC कॅपिटल पार्टनर्सकडे आहे.

दरम्यान यावर्षी आयपीएलमध्ये एकूण १० संघ असतील. तर यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होत आहे. १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे लिलाव होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!