बंगळुरू । भ्रमर वृत्तसेवा : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वासाठी ऑक्शन सुरू असताना अचानक ऑक्शनर ह्युज एडमेड्स जमिनीवर कोसळले. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगा याच्यावर बोली लावली जात असताना ह्युज एकदम स्टेजवरून खाली पडले असता मध्येच ऑक्शन थांबविण्यात आले होते. परंतु सुदैवाने त्यांची प्रकृती उत्तम असून लंचनंतर पुन्हा लिलाव घेण्यासाठी उपस्थित राहिले आहेत.

तसेच टाटा IPL 2022 लिलावाचा आज पहिला दिवस असून आज 106 खेळाडूंचे भवितव्य ठरणार आहे.या लिलावात एकूण 590 खेळाडूंनी भाग घेतला आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तानसह जवळपास सर्वच देशांतील खेळाडूंचा समावेश आहे. एकूण 220 परदेशी खेळाडू, तर 370 भारतीय खेळाडू या लिलावामध्ये आहे. यापैकी 228 कॅप केलेले आणि 355 अनकॅप्ड खेळाडू आहेत.

आतापर्यंत या खेळाडूंवर लागली बोली
– भारताचा स्टार फिरकीपटू यजुर्वेंद्र चहलसाठी मोठी बोली लागली. राजस्थानने चहलला ६.५० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.
– मुंबईसाठी खेळलेल्या राहुलसाठी मुंबई, हैदराबाद, पंजाब, राजस्थान आणि दिल्लीने बोली लावली. पंजाबने राहुलला ५.२५ कोटींमध्ये संघात सामील करून घेतले.
– भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवसाठी पंजाब आणि दिल्लीने बोली लावली. त्याला दिल्लीने कुलदीपला २ कोटींमध्ये संघात घेतले.
– बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानला २ कोटींमध्ये दिल्लीने आपल्या ताफ्यात सामील केले.
– भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी लॉटरी लागली असून त्याला दिल्लीने १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
– हैदराबादने भुवनेश्वर कुमारला ४.२० कोटी देत पुन्हा आपल्या संघात घेतले.
– इंग्लंडचा वेगवान गोलंदाज लखनऊ संघाने मार्क वूडसाठी ७.५० कोटी मोजले.
– ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेझलवूडसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७.७५ कोटी मोजले.
– न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनसाठी गुजरात टायटन्सने १० कोटी मोजले.
– टीम इंडियासाठी दमदार प्रदर्शन केलेला वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णासाठी लखनऊ संघाने सुरुवातीला बोली लावली. मात्र राजस्थानने त्याला १० कोटी देत आपल्या संघात सामील करून घेतले.
– स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहरसाठी दिल्ली आणि हैदराबादने बोली लावली. त्यानंतर चेन्नई आणि राजस्थानही शर्यतीत उतरले. चेन्नईने १४ कोटी देत दीपकला आपल्या संघात घेतले.
– डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नजराजनसाठी हैदराबादने ४ कोटी मोजले.
– विंडीजचा फलंदाज निकोलस पूरनसाठी सीएसके, केकेआर आणि हैदराबादचे बोली लावली. शेवटी हैदराबादने १०.७५ कोटी देत पूरनला आपल्या ताफ्यात सामील केले.
– इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला ६.७५ कोटी देत पंजाब किंग्जने संघात सामील करून घेतले.
– भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी आरसीबी आणि चेन्नईने बोली लावली. आरसीबीने त्याला ५.५० कोटी देत संघात सामील करून घेतले.
– सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या इशान किशनसाठी मुंबई इंडियन्सने सुरुवातीला बोली लावली. मुंबईला पंजाब किंग्जकडून टक्कर मिळाली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादनेही इशानसाठी रस दाखवला. पण मुंबईने १५.२५ कोटी देत इशानला संघात पुन्हा सामील करून घेतले.
– भारताचा अनुभवी खेळाडू अंबाती रायुडूसाठी चेन्नईने बोली लावली. त्याला सीएसकेने ६.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात घेतले.
– ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला दिल्ली कॅपिटल्सने ६.५० कोटी रुपयांना विकत घेतले.
– अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला लखनऊने ८.२५ कोटींच्या किमतीसह संघात दाखल करून घेतले.
– वॉशिंग्टन सुंदरसाठी मुळ किंमत दीड कोटी होती. त्याच्यासाठी गुजरातने बोली लावली. शेवटी सनरायझर्स हैदराबादने त्याला ८.७५ कोटींसह आपल्या संघात सामील करून घेतले.
– श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी (केकेआर) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – केकेआर, दिल्ली, बंगळुरु, लखनऊ, गुजरात)
– कगिसो रबाडा – ९.२५ कोटी (पंजाब किंग्ज) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स ( बोली – दिल्ली, गुजरात, पंजाब )
– शिखर धवन – ८.२५ कोटी (पंजाब किंग्ज) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – दिल्ली, पंजाब, राजस्थान)
– शिरमन हेटमायर – ८.२५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – दिल्ली कॅपिटल्स (बोली – राजस्थान, दिल्ली, कोलकत्ता, राजस्थान)
– ट्रेंट बोल्ट – ८ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – मुंबई इंडियन्स (बोली – मुंबई, बंगळुरु, कोलकत्ता, राजस्थान)
– देवदत्त पडिकल – ७.७५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – आरसीबी (बोली – बंगळुरू, चेन्नई, राजस्थान, मुंबई)
– पॅट कमिन्स – ७.२५ कोटी (केकेआर) आधीचा संघ – केकेआर (बोली – कोलकत्ता, गुजरात)
– फॅफ डुप्लेसी – ७ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – सीएसके (बोली – बंगळुरू, चेन्नई, दिल्ली )
– क्विंटन डि कॉक – ६.७५ कोटी (लखनऊ सुपर जायंट) आधीचा संघ – मुंबई इंडियन्स (मुंबई, चेन्नई, लखनऊ, दिल्ली. कोलकत्ता)
– मोहम्मद शमी – ६.२५ कोटी (गुजरात टायटन्स) आधीचा संघ – पंजाब किंग्ज (बोली – गुजरात, बंगळुरु, कोलकत्ता, लखनऊ)
– डेविड वॉर्नर – ६.२५ (दिल्ली कॅपिटल्स) आधीचा संघ – सनराईजर्स हैद्राबाद (बोली – दिल्ली, चेन्नई, कोलकत्ता, पंजाब, मुंबई)
– आर.अश्विन – ५ कोटी (राजस्थान रॉयल्स) आधीचा संघ – पंजाब किंग्ज(बोली – राजस्थान, दिल्ली)
– मनिष पांडे – ४.६० कोटी (लखनऊ सुपर जायंट) आधीचा संघ – सनराईजर्स हैद्राबाद (बोली – हैद्राबाद, दिल्ली, लखनऊ)
– ड्वेन ब्रावो – ४.४० कोटी (सीएसके) आधीचा संघ – सीएसके (बोली – चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली)
– रॉबिन उथप्पा – २ कोटी (सीएसके) आधीचा संघ – सीएसके (बोली – चेन्नई)
– जेसन रॉय – २ कोटी (गुजरात टायटन्स) आधीचा संघ – सनरायजर्स हैद्राबाद (बोली – गुजरात)
– हर्षल पटेल – १०.७५ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – आरसीबी (बोली – चेन्नई, बंगळूरु, हैद्राबाद)
– नितीश राणा – ८ कोटी (केकेआर) आधीचा संघ – केकेआर (बोली – मुंबई, चेन्नई, केकेआर, लखनऊ)
– जेसन होल्डर – ८.७५ कोटी (लखनऊ) आधीचा संघ – सनरायजर्स हैद्राबाद (बोली – मुंबई, हैद्राबाद, चेन्नई, राजस्थान, लखनऊ)
– दीपक हुड्डा – ५.७५ कोटी (लखनऊ) आधीचा संघ – पंजाब किंग्ज (बोली – राजस्थान, आरसीबी, मुंबई, चेन्नई, लखनऊ)
– हसरंगा – १०.७५ कोटी (आरसीबी) आधीचा संघ – आरसीबी (बोली – हैद्राबाद, पंजाब, लखनऊ, बंगळुरु)
– अनसोल्ड खेळाडू – शाकीब अल हसन, स्टीव स्मिथ , सुरेश रैना, डेविड मिलर, मॅथ्यू वेड, मोहम्मद नबी,