नाशकात राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धांना प्रारंभ

 

नाशिक (प्रतिनिधी):- पुतिन बालन गु्रप आणि महाराष्ट्र ज्युदो संघटनेतर्फे आयोजित 49 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्युदो स्पर्धा नाशिकमध्ये होत आहेत. या स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला.

दोन दिवसात 26 जिल्हातील खेळाडू आपले कसब पणाला लावणार आहे. स्पर्धेतील विजेते लखनौ येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

काल सोमवारपासून स्पर्धेची राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यात आली. मंगळवारी स्पर्धकांची नावनोंदणी, वजन प्रक्रिया, लॉटस् वाटप करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन झाली. उद्घाटन समारंभास जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे , मित्र विहारचे अध्यक्ष विनोद कपूर, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दीपक पाटील, महा. ज्युदो संघटना महासचिव शैलेश शेटकर, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, रवी पाटील, दत्ता आफळे, डॉ. सतिश पहाडे, अर्चना पाहडे, जयेंद्र साखरे, वरीष्ठ प्रशिक्षक विजय पाटील. स्पर्धा संचालक शैलेश देशपांडे यांची उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी पटवर्धन सर, विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे आणि सुहास मैंद आदी प्रयत्नशील आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!