बिबट्याच्या हल्ल्यात चौथीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

 

म्हेळूस्के (वैभव पगार) : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील ४ थी च्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील जि.प. शाळेत इयत्ता ४ थी मध्ये लहाणु उर्फ करण मच्छिंद्र गवारी हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत होता. सोबत ४ ते ५ विद्यार्थी होते. सर्वात शेवटी असलेल्या करणवर बिबट्याने झडप घातली.

निळवंडी कॅनॉल लगत नाईकवाडी परिसरातुन जात असतांना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलाचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दिंडोरी तालुक्यात बिबट्याचा वावर वाढत असून दिवसासुद्धा बिबट्याचे दर्शन होते. त्यामुळे नागरिकांत वर्गात घबराटीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!