अशोक बेकरीची यशस्वी वाटचाल

अशोक बेकरीची स्थापना १९५२ मध्ये मेघराजमल नंदवाणी यांनी केली. तेव्हापासून आजपर्यंत यांची उत्पादने आणि चव नाशिककरांमध्ये पहिली पसंत ठरली आहे. ग्रुपचे आज नव्वद प्रॉडक्ट ग्राहकांच्या जीभेला तृप्त करत आहेत. त्यामध्ये मल्टीग्रेन बिस्कीटस्, ओट, गव्हाचे बिस्किटस्, गुळाचे प्रॉडक्ट, मधुमेहींसाठी खास साखररहित जिरा ओवा घालून तयार केलेले बिस्कीट्स, सुुकामेवा आणि साजूक तुपातील बिस्कीट्स, नाचणीचे बिस्कीट्स, २० प्रकारची खारी उत्पादने यासह विविध नानकटाई, कुकीज हे आणि असे ९० प्रॉडक्ट आज अशोक बेकरीमध्ये तयार केले जातात. दर्जेदार उत्पादने, पारदर्शी व्यवहार, दर्जाशी कधीही न केलेली तडजोड आणि शुद्धता यामुळे अशोका बेकरीचे प्रॉडक्ट नाशिककरांची पहिली पसंती झाली आहे.

सन १९५२ मध्ये मेघराजमल नंदवाणी यांनी सराफ बाजारात नगरकर लेनमध्ये अशोक बेकरीची स्थापना केली. त्याकाळी नाशिकचा विस्तार झाला नव्हता. सराफ बाजारात लोक खरेदीसाठी येत. त्याला लागूनच भांडी बाजार. त्यामुळे लोक खरेदीसाठी येथे येत असे. साहजिक येथे जागा घेऊन अशोक बेकरीचा व्यवसाय सुरू केला. त्याकाळी १६ हजार रुपये खर्च करून मेघराजमल नंदवाणी यांनी बेकरीची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी मेघराजमल नंदवाणी सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत काम करत. ग्राहक त्यावेळी स्वत: रांगा लावून बसत व त्यांचे वाणसामान देऊन बिस्कीट्स व नानकटाई, खारी तयार करून घेत. त्यावेळी आजच्यासारखे पॅकबंद, आकर्षक बॉक्स व सादरीकरण केलेल्या बिस्किट, खारीचा जमाना नव्हता. ग्राहकांच्या आवडीनिवडी अतिशय वेगळ्या होत्या. पौष्टिक, सात्त्विक व स्वत: कच्चा किराणा माल देऊन खारी, बिस्कीट्स व नानकटाई तयार करून घेत. स्वस्ताईचा काळ असल्याने एकत्र कुटुंबपद्धती असे.

एकाच कुटुंबात आजोबापासून नातू-पणतू नांदत. त्या सर्वांना पुरेल इतके पदार्थ तयार करून घेतले जात. अशोक बेकरीमध्ये मेघराजमल नंदवाणी डोळ्यांदेखत बिस्कीट्स व खारी तयार करून देत. लाकडी भट्टीत खारी, बिस्कीट्स तयार केले जात. भट्टीत हे भाजणे म्हणजे प्रचंड मेहनतीचे काम होते. चव बिघडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जात. हे रेसिपी एकदा जमली, की मग पक्‍का तयार मला स्वादिष्ट होत. त्यासाठी स्वत: मेघराजमल नंदवाणी जातीने लक्ष घालून अत्यंत मेहनतीने व प्रामाणिकपणे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत. साहजिकच अशोक बेकरीचे नावलौकिक काळानुरूप वाढतच गेला. नंदवाणी यांच्यातील प्रामाणिकपणा, पारदर्शी व्यवहार आणि खाद्यपदार्थांची चव यामुळे लवकरच बेकरीचे नाव सर्वत्र झाले आणि कुठलीही जाहिरात न करता अशोक बेकरीचा एक स्वतंत्र दर्जेदार ब्रॅण्ड त्या काळी तयार झाला.

त्यानंतर मेघराजमल नंदवाणी यांच्यासोबत त्यांचे पुत्र अशोकलाल मेघराजमल नंदवाणी वडिलांच्या व्यवसायात उतरले आणि त्यांनी या व्यवसायाचा आलेख चढता ठेवला. गुणवत्ता व दर्जेदार माल तयार करून देण्याचे कसब यामुळे ग्राहक स्वत:चे सामान देऊन हे खाद्यपदार्थ तयार करून घेत. तसेच अशोक बेकरीत नंदवाणी परिवार स्वत:चेही प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवू लागले. नंतर नाशिकचा विकास होत गेला, तससशी लोकसंख्या वाढत गेली आणि मग मागणीही वाढत गेली. अशोकलाल नंदवाणी यांनी पूर्वीची लाकडाची भट्टी सोडून मग डिझेलवर चालणारी भट्टी सुरू केली. या प्रॉडक्टची चव इतरत्र कुठेच मिळत नाही, असे त्या काळाचे ग्राहक म्हणत. तो विश्‍वास आणि तीच चव आजही ७० वर्षांनंतही कायम आहे.

सन १९९४ मध्ये अशोकलाल नंदवाणी यांनी अंबड येथे २ हजार ३०० स्क्‍वेअर मीटर जागेत अशोक बेकरीचा विस्तार केला व येथून प्रॉडक्ट सुरू झाले. या काळात नंदवाणी परिवाराकडे प्रचंड भांडवल नव्हते, म्हणून त्यांनी अंबडच्या या नव्या शाखेत जसा पैसा मिळत गेला, त्यानुसार ही दुसरी शाखा वाढवीत नेली. येथे ग्राहकांना तत्पर सेवा देता यावी म्हणून सर्व यंत्रणा व उपकरणे आधुनिक पद्धतीची विकत घेतली. त्यात पीठ मळणी यंत्र, टोस्ट कापण्याचे यंत्र, ८० पत्र्यांची मोठी आधुनिक भट्टी यासह विविध प्रकारचे बिस्कीट्स कट करून यंत्रानेच ट्रेमध्ये सेट करून देणारे अद्ययावत यंत्र बसविण्यात आले. त्यांच्यानंतर अशोकलाल नंदवाणी यांचे पुत्र राजेश नंदवाणी यांनीही वडिलोपार्जित व्यवसायात पदार्पण करून वडिलांच्या व्यवसायाला अधुनिक रूप दिले.

आज सराफ बाजार आणि अंबड या मुख्य शाखेसह गंगापूर रोडवरील आकाशवाणीजवळही अशोक बेकरीची नवीन शाखा सुरू झाली आहे. अंबड आणि सराफ बाजारातून तयार झालेले प्रॉडक्ट येथे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. गाईच्या तुपात गव्हाच्या पिठात शुद्ध, सात्विक पद्धतीने स्वच्छतेचे नियम पाळून येथे टोस्ट, बिस्कीट्स, नानकटाई तयार करून दिली जाते. जैन धर्मातील मुनींसाठी विशेष पद्धतीने त्यांच्या समक्ष हेच नियम पाळून त्यांना हवे असणारे प्रॉडक्ट देण्यात या बेकरीचा नावलौकिक आहे. येणार्‍या काळात अशोका बेकरीचे सर्व काम यांत्रिकी पद्धतीनेच केले जाणार आहे. राजेश नंदवाणी यांचे भाऊ असे एकूण तिघे भांवडे या व्यवसायाला पुढे नेत आहेत.

अशोक ग्रुपचे आज नव्वद प्रॉडक्ट ग्राहकांच्या जिभेला तृप्‍त करीत आहेत. त्यामध्ये मल्टीग्रेन बिस्कीट्स, ओट्स, गव्हाचे बिस्कीट्स, गुळाचे प्रॉडक्ट, मधुमेहींसाठी खास साखररहित जिरा ओवा घालून तयार केलेले बिस्कीट्स, सुुकामेवा व साजूक तुपातील बिस्कीट्स, नाचणीचे बिस्कीट्स, २० प्रकारचे खारी उत्पादने यासह विविध नानकटाई, कुकीज हे व असे ९० प्रॉडक्ट आज अशोका बेकरीमध्ये तयार केले जातात. दर्जेदार उत्पादने, खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी व त्यांना पसंत असणारी चव, तसेच शुद्धता व विश्‍वास यामुळे अशोका बेकरीचे प्रॉडक्ट ही नाशिककरांची पहिली पसंती झाली आहे. आज राजकीय पुढारी, डॉक्टर्स व वकील यांच्यासह सर्वच व्यवसायांतील नामवंत अशोकची उत्पादने आवडीने विकत घेतात. ७० वर्षांपासून सुरू असलेला ग्राहकांचा विश्‍वास टिकवून ठेवत त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करणे, असे भाग्य फार कमी व्यावसायिकांच्या वाट्याला येते.

पादरर्शीपणाने योग्य मेहनत करा…!

इतर व्यवसायात येतात, तसेच अनेक चढउतार अशोक बेकरीनेही पाहिले; मात्र ग्राहकांशी जोडलेले नाते व नावारूपाला आलेला ब्रॅण्ड अबाधित ठेवण्यासाठी कधीही दर्जाशी तडजोड केली नाही, की ग्राहकांशी प्रतारणा केली नाही. सचोटी, प्रामाणिक व्यवहार, उच्च व्यावसायिक मूल्य व पारदर्शीपणा ठेवून व्यवसायाचा आलेख चढता ठेवला. गोदावरीला आलेल्या महापुराचे पाणी तीन वेळा त्यांच्या सराफ बाजार बेकरीच्या दारापर्यंत आले; मात्र ग्राहकांच्या सदिच्छा व ईश्‍वरकृपा यामुळे आमच्या व्यवसायाचे तसूभरही नुकसान झाले नाही, असे राजेश नंदवाणी सांगतात. आपल्या या चढत्या यशाचे गमक काय, असे विचारताच राजेशजी म्हणतात, की तुम्ही व्यवसायात उतरला की योग्य मेहनत, सचोटी व प्रामाणिकपणा सोडता कामा नये. पैशाच्या लोभाने काही केल्यास त्याचे परिणाम चांगले होत नाहीत. हार्डवर्क, चिकाटीने यशाचा आलेख नेहमीच उंचावत जातो.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!