नाशिक :- विहिरीत पडलेल्या बिबट मादीचे रेस्क्यू करण्यात वनविभागाला यश आले आहे.
आज सिन्नर तालुक्यातील मौजे रामनगर येथील शिवाजी केरू मंडले यांचे मा. ग.नं.265 मधील विहिरीमध्ये अंदाजे 2 वर्षाची बिबट मादी पाण्यामध्ये पडलेला अवस्थेत आढळून आली होती.

उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर (प्रा.) कु.मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू करण्यात आले. त्यांच्या समवेत एस.पी. झोपे वनपाल ठाणगाव, किरण गोरडे वनरक्षक, गोरख पाटील, डी.एन. इघे, वसंत आव्हाड, तुकाराम डावरे, रोहित लोणारे, सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ रामनगर यांच्या सहकार्याने या बिबटला सुरक्षितपणे फिजिकली रेस्क्यू करून मोहदरी (माळेगाव) वन उद्यान येथे नेण्यात आले.