नाशिक (प्रतिनिधी) :- व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून गळफास घेऊन घंटागाडी कर्मचार्याने आज पहाटे आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

किरण माणिक पुराणे (वय 26, रा. आदिवासी वाडा, आगरटाकळी, उपनगर) असे आत्महत्या करणार्या घंटागाडी कर्मचार्याचे नाव आहे. किरण ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणच्या काही अधिकारी व कर्मचार्यांकडून मिळणार्या अपमानास्पद वागणुकीला व त्रासाला कंटाळून त्याने आज भल्या पहाटे व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज पाठवून आत्महत्या केल्याचे समजते.

या घटनेची माहिती समजताच त्याच्या भावाने पोलिसांना ही खबर दिली. किरणचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे; संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला आहे.