धक्कादायक : नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारीकेची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी) :- येथील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या परिचारीका महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी परिचारीकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

माधुरी काशिनाथ टोपले (वय 19, रा. सुरगाणा) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. माधुरीने तिच्या रुममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या सहकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

माधुरी टोपलेने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून, तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. माधुरी ही पहिल्या वर्षात शिकत होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!