मुंबई : काल तब्बल 17 तास शिवसेना नेते संजय राऊत यांची चौकशी केल्यानंतर ईडीने राउत यांना काल रात्री उशिरा अटक केली आहे. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी दिल्लीहून ईडीचे पथक आले होते. ईडी अधिकाऱ्यांची तीन पथके संजय राऊतांविरोधात तपास करत होते. यावर आता संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत.

ते म्हणाले, ही खोटी केस दाखवली असून लवकरच संजय राऊत बाहेर येतील. आम्ही न्यायालयीन लढाई लढू. संजय राऊत आणि शिवसेनेचा आवाज दाबवण्यासाठी ही खोटी कारवाई केली गेली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
