राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार संजय राऊत यांना सरकारकडे झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, असे वक्तव्य केले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही बोलणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
दरम्यान संजय राऊत हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्याबद्दल असं बोलणं जाणं दुर्दैवी आहे. गृह मंत्रालयाचं हे टोटल अपयश असल्याचे सुळे यावेळी म्हणाल्या.
संजय राऊतांना झेड प्लस सुरक्षा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलणार असल्याचे सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या टीकेला फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
मी गृहमंत्री झाल्यामुळं अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्या लोकांना मी गृहमंत्री नाही राहिलो तर बर होईल असं वाटत आहे. पण त्यांना मी सांगू इच्छितो की, मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा चार्ज दिला आहे. त्यामुळं जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. मागच्या काळत मी पाच वर्ष गृहमंत्री म्हणून कारभार सांभाळला आहे. मी जे कायदेशीर आहे तेच करतो. मी कोणाला घाबरत नाही. कायद्यानेच वागतो हे राज्य कायद्यानेच चालेल असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंच्या टीकेला दिले. तसेच भविष्यात चुकीचे काम करणाऱ्यांना सोडणार नसल्याचेही फडणवीस म्हणाले.