ललित मोदी यांनी काल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले.

ललित मोदी यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्यांनी सुष्मिताचा उल्लेख बेटरहाफ असा केला. फोटोमध्ये सुष्मिता सेनच्या बोटात अंगठी दिसत आहे. ललित मोदी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली आहे.

ही पोस्ट काल चांगलीच व्हायरल झाल्याने दोघांबाबतच सोशल मिडीयावर चर्चा होती. या सर्व प्रकारानंतर सुष्मिताने प्रतिक्रिया दिली आहे.
तिने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी सध्या आनंदी आहे. मी लग्न केलेले नाही. साखरपुडा देखील केला नाही. सध्या मी प्रेमळ माणसांच्या सानिध्यात आहे. हे माझं स्पष्टीकरण, आता तुम्ही स्वत:चं आयुष्य जगा आणि काम करा. माझा आनंद शेअर केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी शेअर केला नाही त्यांच्यासाठी none of ur business असे लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CgB8of5tHit/?utm_source=ig_web_copy_link