नाशिक युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्वप्नील पाटील चौथ्यांदा विजयी

नाशिक | प्रतिनिधी : राहुल गांधींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये अंत्यत चुरस निर्माण झाली होती. अनेक युवकांनी यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला होता. या चुरशीच्या निवडणुकीत स्वप्नील पाटील यांची सलग चौथ्यांदा विजय मिळवला. प्रदेश युवक सरचिटणीसपदी गौरव पानगव्हाणे यांची निवड झाली.

मध्य-नाशिकच्या अध्यक्षपदी जयेश सोनवणे, पश्चिम नाशिकच्या अध्यक्षपदी देवेंद्र देशपांडे, पूर्व नाशिकच्या अध्यक्षपदी रोहन कातकडे, प्रदेश सचिवपदी आतिषा पैठणकर तसेच ग्रामीण युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मानस पगार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

त्यानिमित्ताने आज काँग्रेस भवन मध्ये त्याचे अभिनंदन नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर व गटनेते शाहू महाराज खैरे, जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, नगरसेवक समीर कांबळे, नगरसेवक वत्सला खैरे, नगरसेवक राहुल दिवे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती-जमाती विभागाचे सरचिटणीस सुरेश मारू, उध्दव पवार, किरण जाधव, विक्रांत वावरे, गौरव सोनार, प्रमोद धोंडगे, सुदेश मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!