नाशिक (प्रतिनिधी) :- हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरणार्या तडीपार गुन्हेगारास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.
सागर गणपत बोडके (वय 22, रा. भरत पटेल गल्ली, फुलेनगर, पेठ रोड) असे अटक करण्यात आलेल्या तडीपाराचे नाव आहे. सागर बोडके याला नाशिक शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे; मात्र काल दुपारी सव्वादोनच्या सुमारास दिंडोरी नाका परिसरात बोडके हा कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून वावरताना आढळून आला.
त्याला पोलिसांनी अटक करण्यात आली असून, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.