नाशिक (प्रतिनिधी) : टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय खेल प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान इंदौर येथे होणार्या खेलो इंडिया टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या तनिशा कोटेचा हीची निवड झाली.
या पूर्वी तनिशाची गोहाटी व पंचकूला (हरियाणा) येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धा मुले व मुलींच्या एकेरी व दुहेरी गटाच्या होणार आहेत. एकेरीकरीता देशातील १९ वर्षाखालील गटातील पहिल्या बारा मानांकित मुले व मुलींचा यात समावेश आहे. या गटात तनिशा ही देशात चौथी मानांकित खेळाडू आहे.

या स्पर्धेत ती आणि रीशा मीरचंदानी (टिएसटिटिए) दुहेरी मधे खेळणार आहेत. तनिशा ही जय मोडक यांच्या मार्गशनाखाली सराव करत आहे. याशिवाय रीशा मीरचंदानी (टिएसटिटिए) व पृथा वर्टिकर (पुणे), जेनिफर वर्गीस (नागपुर) या महाराष्ट्रातील या तीन खेळाडूंचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचबरोबर मुलांमध्ये जश मोदी (टिएसटिटिए) व निल मुळे (पुणे ) यांचीहि निवड झाली आहे.
तिच्या या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी, अलका कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.