टी-20 विश्‍वचषकानंतर टीम इंडिया ’या’ देशाच्या दौर्‍यावर

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्डकपच्या तयारीमध्ये गुंतली आहे. दरम्यान टी-20 वर्ल्डकपनंतर देखील टीम इंडियाच्या खेळाडूंचं वेळापत्रक व्यस्तच राहणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्डकपनंतर टीम न्यूझीलंडविरोधात मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाच्या आगामी व्यस्त वेळापत्रकात आणखी एका दौर्‍याची भर पडली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकप पार पडल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडमध्ये वन-डे आणि टी-20 सामन्यांची सिरीज खेळवण्यात येईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबद्दलची घोषणा केली आहे. 18 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दोन्ही टीम्स 3 वन-डे आणि 3 टी-20 सामन्यांची सिरीज खेळतील.

यानंतर 2023 च्या जानेवारी महिन्यात न्यूझीलंडची टीम मर्यादीत ओव्हर्सच्या सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!