मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या टीमला आणि दिग्दर्शकांना जाहीर माफी मागावी लागली आहे. दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकरांच्या गाण्याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे निर्मात्यावर माफी मागण्याची वेळ आली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या शेवटच्या दोन भागांमध्ये ‘गोकुलधाम सोसायटी’च्या सदस्यांनी म्युझिकल नाइटचा आनंद लुटला. यादरम्यान, लता मंगेशकर यांचे ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणं 1965 मध्ये प्रदर्शित झाले असे म्हटले होते.

पण ही माहिती चुकीची आहे. एपिसोड प्रसारित झाल्यानंतर, निर्माते असित कुमार मोदी आणि तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर माफी मागितली.
https://twitter.com/TMKOC_NTF/status/1518639257635946496?t=bQIBTz_Prtm4e1H4R6sXQA&s=19
त्यात लिहिले आहे की, ‘आम्ही आमचे दर्शक, चाहते आणि हितचिंतकांची माफी मागू इच्छितो. आजच्या एपिसोडमध्ये, आम्ही अनवधानाने ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याच्या रिलीजचे वर्ष 1965 असा केला आहे. पण आम्ही याबाबत स्वतःला दुरुस्त करू इच्छितो. हे गाणे 26 जानेवारी 1963 रोजी रिलीज झाले आहे. आम्ही भविष्यात सजग राहण्याचे वचन देतो. तुमच्या समर्थनाची आणि प्रेमाची आम्ही प्रशंसा करतो.’ अलीकडच्याच एपिसोड्समध्येच हा प्रकार घडला.