अंबरनाथजवळ मध्य रेल्वेच्या डाऊन लाईनवर तांत्रिक बिघाड झाला आहे. मालगाडी बंद पडल्याने अंबरनाथवरून पुढे जाणारी वाहतूक अक्षरश: ठप्प झाली आहे. अचानक वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथे मध्य रेल्वेच्या डाऊन लाईवर एका मालगाडीत तांत्रिक बिघाड झाला. मालगाडी अचानक बंद पडल्याने कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या जवळपास १५ ते २० मिनिटापासून अंबरनाथ स्थानकावरच आहेत.
अचानक मालगाडीत बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाचं काम सुरू करण्यात आलं असून लवकरच लोकलची वाहतूक सुरळीत होईल, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.