नागपूर : येथे चॉकलेट खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. मदन गोपाल शाळेतील १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. बाधित विद्यार्थ्यांवर लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती शाळेच्या गेटवर आला होता. माझा वाढदिवस आहे, असे त्याने सांगितले आणि काही मुलांना चॉकलेट्स खायला दिले. त्यानंतर त्यातील १७ मुलांना अस्वस्थ वाटू लागले. मुलांनी त्यांना होणारा त्रास शिक्षकांना सांगितला असता त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या घटनेतील ३ मुले अत्यवस्थ असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चॉकलेट देणारा व्यक्ती कोण होता? याचा तपास पोलिस करीत आहेत. अशा प्रकारे चॉकलेट देऊन लहान मुलांना भलतेच काहीतरी खायला दिल्याने नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे.