मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. परंतु, आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्येत पोहचणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य ठाकरेंचा दौरा 10 जून रोजी निश्चित झाला होता, मात्र त्यात बदल होऊन आता या दौर्याची तारीख 15 जून झाली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याची तारीख निश्चित केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते,पदाधिकारी देखील असणार आहेत.