नाशिक (प्रतिनिधी) :- राष्ट्रीय खो- खोमध्ये चमक दाखविणार्या नाशिकच्या खेळाडूंनी दहावीच्या परीक्षेत देखील बाजी मारली. या खेळाडूंनी कोणत्याही क्लासला न जाता मैदानाला क्लास समजून सकाळ व सायंकाळ सराव करुन अभ्यास केला. खेळातूनच सकारात्मक उर्जा घेऊन प्रबोधिनीच्या या कन्या हसत खेळत दहावीच्या परीक्षेला सामोर्या गेल्या.
प्रबोधनीतील या खो-खो खेळाडूंचे शहरात कौतुक होत आहे. या खेळाडूंमध्ये कु. सरीता दिवा 72.60%, कु.निशा वैजल 81.00%, कु. सोनाली पवार 76.20%, राज्य उपविजयी कु. दिदी ठाकरे 81.40%, कु. ऋतूजा सहारे 77.00%, कु. ज्योती मेढे 67.80%, राज्य सहभाग- कु. दिक्षा सिताड 69.80% कु. जना घुटे 60.60% गुण मिळवले आहेत. यातील बहुतेक मुली ह्या पेठ, सुरगाणामधील दुर्गम भागातील आहे. अशाही परिस्थितीत या मुलींनी मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर चमक दाखविणार्या या सर्व नाशिककर कन्यांचे नाशिक जिल्हा खो-खो असोसिशन, संस्कृती नाशिक, समर्पण नाशिक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.