नाशिक (प्रतिनिधी) :- प्रेमसंबंधातून युवतीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार करणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुलगी आणि आरोपी तरुण यांच्यात दि. 18 ऑगस्ट 2021 ते दि. 21 जुलै 2022 यादरम्यान प्रेमसंबंध होते. या संबंधातून तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून तिच्यावर तिच्या राहत्या घरी व कॅफेमध्ये तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिच्यासोबत अश्लील फोटो काढले. हे फोटो फेसबुकला शेअर करीन, अशी धमकी व शिवीगाळ करून त्याने या युवतीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले.

या युवतीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. याचा राग आल्याने या तरुणाने युवतीचे अश्लील फोटो तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करून तिची बदनामी केली. वारंवार होणार्या या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निंबाळकर करीत आहेत.