छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ’द कपिल शर्मा शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

’द कपिल शर्मा शो’ची टीम यूएसए आणि कॅनडा टूरवर आहे. प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता असलेला ’द कपिल शर्मा शो’चे नवे पर्व पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वाची आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सिनेमांचे प्रमोशन करण्यात येत असते. सोनी टीव्हीवर ’द कपिल शर्मा शो’ 3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. भारती सिंह, चंदन प्रभाकर, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, कीकू शारदा हे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत असतात.
नव्या पर्वात काही नवीन विनोदवीरदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक मनोरंजक बनणार आहे. 6 वर्षांत या शो ने खूप लोकप्रियता मिळविली आहे.