न्यूड फोटोशूट प्रकरण रणवीरला भोवले

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा): – बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच एक न्यूड फोटोशूट केलं. त्याच्या या फोटोशूटनं सगळ्यांनाच थक्क करुन सोडलंय. त्याच्या न्यूडफोटोशूटमुळे त्याच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या पहायला मिळत आहे.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहनं नुकतंच एक न्यूड फोटोशूट केलं. त्याच्या या फोटोशूटनं सगळ्यांनाच थक्क करुन सोडलंय. त्याच्या न्यूडफोटोशूटमुळे त्याच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या पहायला मिळत आहे.
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे.

मुंबई चेंबुर पोलीस ठाण्यात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.
न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहवर एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. मुंबई चेंबुर पोलीस ठाण्यात त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असून त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. एनजीओ चालवणार्‍या ललित श्यामने रणवीर सिंह विरोधात एफआयआर दाखल केली आहे. महिलांच्या मनात लाज निर्माण होईल आणि त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप रणवीरवर केला आहे.

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी रणवीरविरुद्ध आयपीसी कलम 509, 292, 294, तर आयटी कायद्याच्या अंतर्गत 67अ कलम दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रणवीरवर अटकेची टांगती तलवार असल्यांचं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!