नाशिक : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांत मुद्रांक नोदणीचे कामकाज 11 जुलै पासून सकाळी 7.30 रात्री 8.45 वाजेपर्यंत दोन सत्रात होणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, दुय्यम निबंधक कार्यालयांत मुद्रांक नोंदणीचे कामकाज करतांना सर्व्हवर वर पडणारा ताण व त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी, नाशिक कार्यालयाकडून सकाळ व दुपार अशा दोन सत्रात कामकाज करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास राज्याचे नोंदणी महानिरिक्षक तथा मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे कामकाज 11 जुलै 2022 पासून दोन सत्रात होणार आहे.

वरीलप्रमाणे कार्यालयीन वेळेत झालेल्या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी. सदरचा बदल नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी केले आहे.