नाशिक (प्रतिनिधी) :– गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना http://www.mahresult.nic.in या लिंकवर ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार असून, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.