वणी-नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर बर्निंग कारचा थरार

वणी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यामधील वलखेड फाट्यावर पिंपरखेड येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा करच्या वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे अचानक पेट घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, वणी-नाशिक रस्त्यावरील वलखेड फाट्यावर आज (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास इंडिका विस्टा गाडीने अचानक पेट घेवून जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. पिंपरखेड, ता. दिंडोरी येथील बळीराम घडवजे यांच्या इंडिका विस्टा एमएच १२ एफएन ०७४५ या करच्या वायरिंग शॉर्टसर्किट झाल्यामूळे अचानक गाडीने पेट घेतला. गाडी मध्ये चालक बळीराम घडवजे हे एकटे होते.

गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच ते गाडीच्या बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये अग्निक्षमक दल व वाहन नसल्याने आगीची घटना घडली तरी देखील नागरिकांना बघ्याची भुमिका घेतल्या शिवाय दुसरा पर्याय राहात नाही, त्यामुळे जिवीत व वित्तीय हाणीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!