मुंबई :– मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर शिवसेनेच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत 15 आमदार तर 3 आमदार मतदार संघातून होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आता 18 आमदार सोबत आहेत. तर मुंबईत आल्यानंतर 21 आमदार आमच्यासोबत येतील असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करणार असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसेना मविआतून बाहेर पडण्यास तयार आहे. मात्र बंडखोर आमदारांनी मुंबईत येवून ही इच्छा व्यक्त करावी असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद केले.
त्या आमदारांनी मुंबईत यावे, त्यांची जी मागणी आहे, ती अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर मांडावी. त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल. पण त्यांनी आधी मुंबईत येण्याची हिम्मत दाखवावी.

तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका. आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसेना सोडणार नसल्याचे सांगताहेत. आमची भूमिका सध्याच्या सरकारबाबत आहे. महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर या आणि भूमिका मांडा. नक्कीच तुमच्या भूमिकेचा विचार होईल. 24 तासात परत या.”, असेही संजय राऊत यांनी पुढे सांगितले.
शिंदे गटातल्या 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी किती व्हिडीओ पाठवले तरी ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा ते शिवसेनेचे असतील.
या सर्वांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर आम्ही विजयी होऊ.”, असेही संजय राऊत यांनी सांगितले.