नाशिकमधील शिवसेनेच्या “या” 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

नाशिकरोड (प्रतिनिधी) :- सध्या शिवसेना, भाजपा मध्ये आउट गोइंग, इन्कामिंग सुरू झाले असून दोन दिवसांपूर्वी तीन नगरसेवक सेनेत दाखल होत नाही तोच सेनेचे दोन माजी नगरसेवक आज भाजपात डेरेदाखल झाले.

कदम लॉन्स येथे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात जेलरोड येथील अशोक सातभाई व देवळाली गावं येथील अस्लम (भैय्या) मणियार या दोन माजी नगरसेवकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांची पाठ फिरताच नाशिक भाजपा मधील तीन विद्यमान नगरसेवक हे मुंबई शिवसेना भवन येथे शिवबंधनात अडकले. तो भाजपा ला धक्का दिला असे असतानाच भाजपाने नाशिकरोड येथील दोन माजी नगरसेवक गळाला लावले.

नाशिकरोड भागात प्रभाग रचनेत मोठा बदल केला आहे.अनेक विद्यमान नगरसेवकांना त्याच पक्षात राहून उमेदवारी मिळते की नाही याची शाश्वती नसल्याने पक्ष बदले जात असल्याचे नागरिक मध्ये चर्चा होती. सन २०१२ ते २०१७ या काळात अशोक सातभाई हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेवक झाले होते. सभागृह नेते पद ही त्यांनी त्या काळी भोगले, त्या नंतर मनसे ची सत्ता जाताच २०१७ मध्ये ते स्वगृही म्हणजे सेनेत आले. सेनेकडून लढल्यानंतर त्यांना पराभव पत्करावा लागला. आत्ता पुन्हा भाजपा कडून ते यंदा महापालिकेत जाण्याचे नशीब अजमावणार आहेत.

अस्लम मणियार हे शिवसेनेकडून महापालिकेत गेले होते.स्थायी समितीचे सदस्य हे लाभाचे पद ही त्यांनी उपभोगले होते. उत्तर महाराष्ट्रात एकमेव शिवसेना नगरसेवक म्हणून त्याची नावलौकिक होते.नंतर त्याच्या निवडणूकित त्याना पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यानी नाराजी व्यक्त केली, निवडणूक संपताच त्यांनी मनसेच्या इंजिनात राजकीय प्रवास केला. काही काळ तटस्थ राहिल्या नंतर त्यांनी आज भाजपा कमळ हाती घेतले.

या दोन्ही ही शिवसेनेचे बाळकडू असलेल्या नगरसेवकांना पक्ष बदलल्या नंतर महापालिकेत संधी मिळाली होती, यंदा हे दोघे भाजपाच्या वाटेने महापालिकेत जातील का? आता हे येणारा काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!