नाशिक (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील सात नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केले असून राज्यातील 208 नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रभाग रचना देखील तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये अबक अशा 208 नगरपालिकां करिता प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यामध्ये अ वर्ग १६, ब वर्ग 68 आणि क वर्ग १२० नगरपालिकांचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यामधील सात नगरपालिकांचा यामध्ये समावेश असून त्यामध्ये मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव, भगूर, सटाणा व चांदवड नगरपालिका यांचा समावेश आहे. 7 मार्च पर्यंत या प्रभागरचना पूर्ण करून आयोगाला सादर करावयाचे आहेत त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि त्यानंतर आता नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघणार आहे.