मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले “हे” महत्त्वाचे निर्णय

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव करण्यात आले. त्यात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील हे नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. काल देखील कॅबिनेटची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच्या बैठकीसाठी मंत्रालयात उपस्थित होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले “हे” महत्त्वाचे निर्णय

  • औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता
  • उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणास मान्यता.
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता.
  • राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार.
  • कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार (विधि व न्याय विभाग)
    अहमदनगर – बीड – परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
  • ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबवणार.
  • शासन अधिसुचना 8 मार्च 2019 अनुसार आकारायच्या अधिमुल्याची रक्कम भरण्याच्या कालावधीस मुदतवाढ देण्याचा निर्णय.
  • विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ ही विकास मंडळे पुनर्गठीत करण्याचा निर्णय.
  • निवड झालेल्या परंतु मराठा आरक्षण रद्द झाल्याने नियुक्ती न मिळालेल्या एसईबीसी उमेदवारांकरिता अधिसंख्य पदे निर्माण करण्यासाठी विधेयक मांडण्याचा निर्णय.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!