पीएफआय कार्यकर्त्यांकडे सापडले ‘हे’ साहित्य

मुंबई : भारताचे इस्लामिक देशात रुपांतर करण्याचा डाव रचणार्‍या पीएफआयच्या एका कार्यकर्त्याकडे बाबरी मशीद नही भुलेंगे, असे लिहिलेले साहित्य सापडले आहे. त्यामुळे त्यांचा इस्लामीकरणाचा डाव पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून, औरंगाबादला धर्मांधतेचे हब आणि भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा कट पीएफआयकडून रचण्यात आला होता. यासाठी पीएफआयच्या सदस्यांचे विद्रोही पुस्तकाच्या माध्यमातून ब्रेन वॉश करण्यात येत होते. तर एटीएसने ताब्यात घेतलेल्या पीएफ कार्यकर्त्यांकडे ‘बाबरी मशीद नही भुलेंगे’ लिहलेले साहित्य सापडले आहे. अटक असलेल्या पीएफ कार्यकर्त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडीची मुदत वाढवली आहे.

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफ कार्यकर्त्यांमध्ये इरफान मल्ली हा संघटनेच्या राज्य कमिटीचा सदस्य म्हणून काम करत होता. एटीएसने त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरात एक तलवार सापडली आहे. तर त्याने अशी शस्त्रे अनेकांना वाटप केल्याचा संशय एटीएसला आहे. सोबतच त्याच्याकडे पीएफआयचे पब्लिकेशन सापडले असून, ज्यात ’बाबरी मशीद नही भुलेंगे’ लिहिलेले साहित्य सापडले आहे. विशेष म्हणजे इरफान एक खाजगी मदरसा चालवत होता आणि तिथेच तो जिहादी शिक्षण देत असल्याचा एटीएसला संशय आहे. त्यामुळे त्याच्याकडे कुणी शिक्षण घेतले त्यांची पार्श्वभूमी सुद्धा एटीएसकडून तपासले जाणार असल्याची शक्यता आहे.

एटीएसने न्यायालयात वरील माहिती दिली. विशेष म्हणजे एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईत औरंगाबाद जिल्ह्यातून पाच जणांना अटक करण्यात आली होती. तर इतर 12 ते 13 जणांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते. त्यामुळे औरंगाबाद शहर पीएफआयचा केंद्रबिंदू असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. त्यातच औरंगाबादला पीएफआयच्या सदस्यांना धर्मांधतेचे हब बनवायचे होते हे एटीएस तपासातून स्पष्ट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेल्या शेख इरफान मल्ली, सय्यद फैजल,परवेज खान, अब्दुल हबीब, नासेर शेख यांच्या विरोधात देशविघातक कृत्यांच्या नियोजनाच्या दृष्टीने सबळ पुरावे असल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे. यातील नासेर शेखच्या बँक खात्यावर पैशांची मोठी उलाढाल झाल्याचे तपासात समोर आले आहे. तर परवेज खान आणि सय्यद फैजलकडे शारीरिक प्रशिक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. अब्दुल हबीब याच्याकडे विद्रोही विचार पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तर नासेरच्या इशार्‍यावर मराठवाड्यातील काम चालत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!