नाशिक जिल्ह्यातील “ही” तालुके कोरोनामुक्तीच्या मार्गावर

नाशिक :-जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६६ हजार ४०९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३५९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये
१०६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ८ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

*उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १२, बागलाण १२, चांदवड ०९, देवळा ०८, दिंडोरी २०, इगतपुरी ०२, कळवण २३, मालेगाव ०२, नांदगाव ०२, निफाड २५, पेठ ०७, सिन्नर ११, सुरगाणा २१, त्र्यंबकेश्वर ४५, येवला ०३ असे एकूण २०२ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १२४, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ०८ तर जिल्ह्याबाहेरील २५ रुग्ण असून असे एकूण ३५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७५ हजार ६६१ रुग्ण आढळून आले आहेत.

*नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण*

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ०१, बागलाण ००, चांदवड ०१, देवळा ००, दिंडोरी ०१, इगतपुरी ००, कळवण ०१, मालेगाव ००, नांदगाव ००, निफाड ०२, पेठ ००, सिन्नर ०१, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ३२, येवला ०२ असे एकूण ४१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

*रुग्ण बरे होण्याची टक्केवारी*

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९७.४५ टक्के, नाशिक शहरात ९८.४५ टक्के, मालेगाव मध्ये ९७.३२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.१९ टक्के . तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.०३ इतके आहे.

*मृत्यु :*

नाशिक ग्रामीण ४ हजार ३०० नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार १०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३६४ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ८९३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

*लक्षणीय :*

◼️४ लाख ७५ हजार ६६१ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ६६ हजार ४०९ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ३५९ पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के.

*(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!