’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील अभिनेता निखिल बने याने त्याच्या घराचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

महाराष्ट्रभरात लाखो चाहते असलेल्या या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आजही चाळीतील घरात राहतो. त्याने त्याच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

निखिल या कार्यक्रमामुळेच नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीस आलेला निखिल भांडूपमधील एका चाळीमध्ये राहतो. त्याने त्याच्या याच घराचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. निखिलने त्याच्या घराची आता सुधारणा केली आहे. पण त्यापूर्वी आपले घर कसे होते आणि आता कसे आहे हे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे.
जुन्या जागेत आत्मा असतो. त्यामुळे ती जागा सोडण्यापेक्षा अधिक चांगली करण्यात खरी मज्जा आहे. तसेच घर नव्या पद्धतीने उभारण्यासाठी चाळीतल्या लोकांची त्याला बरीच मदत मिळाली. यादरम्यानचा देखील त्याने एक व्हिडीओ शेअर केला. चाळीत एकत्र राहण्याची हिच खरी मज्जा आहे. सुख असो, दुःख असो किंवा काहीही मदत असो सगळे धावून येतात. अशा शब्दांमध्ये निखिलने आपल्या चाळीतल्या मित्रांंचे कौतुक केले.
https://www.instagram.com/reel/CeoOJCEpvFo/?utm_source=ig_web_copy_link