बिग बॉस मराठी ४च्या होस्टसाठी “या” अभिनेत्याचे नाव चर्चेत

मराठीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शोपैकी ‘बिग बॉस मराठी’ हा शो आहे. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील भांडण, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच चर्चेत असतो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले होते. चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन ते करणार नसल्याचे बोलले जात आहे.

बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्यासोबत केलेला तीन वर्षांचा करार गेल्यावर्षी संपला आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. चौथ्या पर्वासाठी एका प्रसिद्ध कलाकाराचे नाव समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बिग बॉस मराठीचे चौथे पर्व होस्ट करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठीतील एक आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या विविध भूमिका साकारताना दिसत आहे.

मराठीसोबतच अनेक हिंदी चित्रपटातही त्याने महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यामुळे तो बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करु शकतो असे बोलले जात आहे. अद्याप याबाबत सिद्धार्थकडून कोणताही खुलासा आलेला नाही. त्यामुळे तो नक्की हे पर्व होस्ट करणार की नाही याबद्दल विविध तर्क-विर्तक सुरु झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!