बंगळुरू (भ्रमर वृत्तसेवा):- सिद्धांत कपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ’सिद्धांत कपूरसह 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची वैद्यकिय चाचणी केल्यानंतर त्या सर्वांनी ड्रग्सचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती एका वृत्तसंस्थेला पोलीस अधिकार्यांनी दिली.

सिद्धांत हा बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. बंगळुरुमधील एका ड्रग्स पार्टीमध्ये सिद्धांत उपस्थित होता. 5 स्टार हॉटेलमध्ये ही हाय प्रोफाईल पार्टी सुरू होती. या ड्रग्स पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. बंगळुरु पोलिसांनी सिद्धांतसह 50 जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या प्रकरणात अजून श्रद्धा कपूर किंवा तिचे वडील शक्ति कपूर यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. सिद्धांतच्याआधी ड्रग्स प्रकरणात दीपिका पदुकोणपासून रिया चक्रवर्तीसह अनन्या पांडे, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांची चौकशी करण्यात आली होती.
सिध्दांत कपूरने ’शूटआउट अॅट वडाला’, ’चेहरे’, अग्ली या हिंदी चित्रपटांमध्ये सिद्धांतनं काम केले आहे. त्याने ’भूल भुलैया’, ’चुप चुप के’, ’ढोल’, ’भागम भाग’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या भौकाल या सीरिजमध्ये चिंटू देढा नावाची भूमिका सिद्धांतनं साकारली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 2020मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं श्रद्धा कपूरची चौकशी केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर 2020 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने श्रद्धा कपूरची चौकशी केली होती. गोव्यातील क्रुझ पार्टीत अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अडकल्याच्या प्रकरणानंतर एखाद्या अभिनेत्याचा मुलगा ड्रग्ज पार्टीत अडकल्याची ही दुसरी घटना आहे.