छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांनी ‘स्टार प्लस’ रिअॅलिटी शोमध्ये ‘स्मार्ट जोडी’चा किताब पटकावला आहे. या जोडीने अंतिम फेरीत बलराज-दीप्ती आणि नेहा स्वामी-अर्जुन बिजलानी यांचा पराभव करून या रिअॅलिटी शोची ट्रॉफी जिंकली. काल रात्री स्मार्ट जोडीचा महाअंतिम सोहळा स्टार प्लसवर ऑन एअर झाला.

अंकिता लोखंडेने रविवारी रात्री इंस्टाग्रामवर स्मार्ट जोडीच्या फिनालेची झलक शेअर केली आहे. यासोबतच तिने भरभरून प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभारही मानले. हा व्हिडीओ शेअर करत अंकिताने तिचा नवरा विकी जैन याच्यासाठी एक मेसेजही लिहिला आहे. टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैनवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडिया असो किंवा कोणतेही प्लॅटफॉर्म, ती नेहमीच आपल्या पतीचे कौतुक करताना दिसते.

विकी जैन सोबत 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न अंकिता लोखंडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ’स्मार्ट जोडी’च्या फायनल दरम्यान एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अंकिता तिचा पती विकी जैनसोबत रोमँटिक होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ‘मी त्याच्यासोबत असल्यापासून मी एक वेगळी व्यक्ती बनले आहे. त्याने माझ्यात स्थैर्य आणले आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की, प्रत्येक गोष्टीसाठी तुझी खूप खूप आभारी आहे.’
अंकिता-विकीला ‘स्मार्ट जोडी’ची ट्रॉफी, 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहेत. अंकिता आणि विकीवर कौतुकाचा वर्षाव झाला.
https://www.instagram.com/tv/CebuFK5Fxq_/?utm_source=ig_web_copy_link