नवी दिल्ली :- भारत आणि इंग्लंडमध्ये पहिला आणि एकमेव कसोटी सामना 1 जुलैला होणार असून याआधी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. काल त्याच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बीबीसीसीआयने ट्विट करत दिली आहे.
रोहित शर्मा सध्या बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
बीबीसीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे, की, ‘भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रोहित टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये आहे. रविवारी रोहितची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.’
https://twitter.com/BCCI/status/1540810550820716544?t=uRG964f4RlePR91lYJGaXw&s=19