मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सर्वच क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला
मालदीवमधून परतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समजते.
पुढच्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंड दौऱ्यावर एकमेव कसोटी सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधी विराट कोहलीला कोरोना झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धची ही कसोटी 1 जुलैपासून सुरू होणार असून ती 5 जुलैपर्यंत खेळवली जाणार आहे.

रविचंद्रन अश्विननंतर आता विराट कोहलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता अशा परिस्थितीत आणखी खेळाडूंना कोरोना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय संघ 24 जूनपासून लीसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे.