औरंगाबाद :- पेट्रोलच्या दराने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. त्यात आज सर्वसामान्यांना दिलासा देणारा उपक्रम राबविला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त औरंगाबादच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर मनसेकडून 54 रुपये लिटर प्रमाणे पेट्रोल विक्री केली जाते आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आजचा दिवस का होईना दिलासा देण्याचा उपक्रम मनसेकडून राबवला जातोय. 54 रुपये लिटरप्रमाणे पेट्रोल मिळत असल्याने पेट्रोल पंपावर वाहनचालकांनी मोठी गर्दी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले आहेत.