नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज नाशिकमध्ये 24 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर सध्या एकूण 79 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
आज सायंकाळी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २४ असुन नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ही संख्या 13 वर पोहोचली होती तर नाशिक शहरामध्ये म्हणजे मनपा क्षेत्रात 9 मालेगाव मनपा मध्ये 2 असे एकूण 24 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.