नवी दिल्ली :- भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आज आज देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. आज सलग पाचव्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

21 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचे उत्पादन शुल्क हटवले होते. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले होते.

राज्यातील काही शहरांतील पेट्रोल व डिझेल चे दर “असे” आहेत
महाराष्ट्रातील मुंबई शहरात पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.