जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँका उद्या रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

 

नाशिक (भ्रमर वृत्तसेवा) : वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँक, देना बँक आणि शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँक शाखा उद्या (दि. 31) रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जारी केले आहेत.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे की, शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांची वित्तीय वर्ष अखेरच्या दिवशी उशिरापर्यंत प्राप्त झालेले अनुदान खर्ची टाकून जिल्हा कोषागार व तालुका उपकोषगार कार्यालयात देयके सादर केली जातात. त्याप्रमाणे वितरीत होणारी देयके व धनादेश स्टेट बँकेत वटपून रक्कम काढणे, महसुली उत्पन्नाच्या रकमा शासनाकडे भरणा करणे यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्ह्यातील भारतीय स्टेट बँकेची कोषागार, नाशिक रोड व देवळाली कॅम्प शाखा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेली स्टेट बँक शाखा तसेच तालुका सुरगाणा येथील देना बँक व शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या अन्य बँक शाखा यांची कार्यालये रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!