भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (प्रतिनिधी) :- पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना मखमलाबाद गावात घडली.

याबाबत गोरख अरुण गवळी (रा. खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. गवळी यांचे वडील अरुण भगवान गवळी (वय 52) हे एमएच 15 डीडी 7236 या क्रमांकाच्या मोटारसायकलीने मखमलाबाद गावाकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच 15 एके 1118 या क्रमांकाच्या ट्रकवरील चालक दिलीप पंढरीनाथ रासे (वय 50, रा. संताजीनगर, बजरंगवाडी, नाशिक) याने दुचाकीला धडक दिली. हा अपघात मखमलाबाद गावातील खंडेराव मंदिरासमोर झाला. यात गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!