जम्मू-काश्मीरमध्ये दोन शक्तीशाली स्फोट; “इतके” जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील जम्मूच्या नरवाल भागामध्ये आज (दि. २१) एकामागून एक दोन शक्तीशाली स्फोट झाले आहे. या स्फोटात ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाच्या फरकाने हे स्फोट झाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ जम्मूमध्ये दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पहिला स्फोट झाला यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यानंतर अर्ध्या तासाच्या फरकाने दुसरा स्फोट झाला यामध्ये २ जण जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या घटनांनंतर संपूर्ण भागामध्ये नाकेबंदी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटासाठी महिंद्रा बोलेरे या वाहनाचा वापर करण्यात आला होता.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या जम्मूमध्ये सुरु आहे. यामध्ये शेकडो लोग सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर हे दोन स्फोट झाल्याने ही बाब गंभीर समजली जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर सीआरपीएफ, आर्मी तसेच स्थानिक जम्मू आणि काश्मीर पोलीस अॅलर्ट मोडवर आले आहेत.

सुशील कुमार (वय २६), सुहैल इक्बाल (वय ३५), विनोद कुमार (वय ५२), विशाल प्रताप (वय २५), अरुण कुमार तर अमित कुमार (वय ४०) आणि राजेश कुमार (वय ३५) अशी जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत.

https://twitter.com/ANI/status/1616681361892573184?s=20&t=jPnMhB72TuTKrpUmukPwww

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!