ओएलएक्सवरील वाहने चोरून विकणार्‍या दोघा भावंडांना अटक

कल्याण (भ्रमर वृत्तसेवा):- ओएलक्सवर विक्रीसाठी जाहीरात आलेल्या वाहनांची कागदपत्रे मिळवून ती परस्पर विकणार्‍या दोघा सराईत चोरट्यांना कल्याण येथील महात्मा फुले पोलीस चौकीच्या पोलिसांनी अटक केली आहे.

मोहम्मद अकबर अब्दुल अजीज शेख आणि जुनेद अब्दुल अजीज शेख अशी या दोन चोरट्यांची नावे असून दोघे सख्खे भाऊ आहेत. एक इसम चोरीची बुलेट विकण्यासाठी कल्याण पश्‍चिम बैल बाजार परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी आरोपी महम्मद अकबर शेख याला अटक केली. या गुन्ह्यात त्याला मदत करणार्‍या त्याचा भाऊ अब्दुल अजीज शेख याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

दोघे आरोपी ओलएक्सवर विक्रीसाठी अपलोड केलेल्या दुचाकी सारखीच दुचाकी चोरी करायचे. नंतर ऑनलाईन गाडी खरेदी करण्यासाठी चौकशी करत संबंधित मालकाकडून गाडीचे कागदपत्र मागून घेत होते. या कागदपत्रावरुन चोरीच्या गाडीचे कागदपत्र तयार करायचे . त्यानंतर चोरीची गाडी ओलएक्सवर विकायचे . या दोघांविरोधात याआधी देखील वाहन चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत. या 14 गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी 11 वाहने जप्त केली आहेत. यात 2 बुलेट, 6 दुचाक्या आणी 1 रिक्षा यांचा समावेश आहे. त्यांनी अशाच प्रकारे आणखी काही गाड्या विकल्या असाव्यात, असा संशय पोलीस उपनिरीक्षक उमेश माने पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!