उंबरठाणला खैर लाकडाची चोरी रोखली

नाशिक (प्रतिनिधी) :- वनविभागाने रात्रीच्या वेळी उंबरठाण वनपरिक्षेत्रात चोरीच्या मार्गाने खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु अंधाराचा फायदा घेऊन येथील आरोपी माल सोडून फरार झाले.

मिळालेल्या गुप्त बातमीनुसार उंबरठाण वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र उंबरठाण मधील मौजे दरापाडा राखीव वन कक्ष क्र. ३५ यात रात्रीची गस्त घालत असतांना एक क्वालिस वाहन तपासणी कामी थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या वाहनातील अज्ञात इसम रात्रीच्या वेळी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये खैर जातीच्या लाकडाचे नग मिळाले. हे वाहन चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. सदर टोयोटा क्वालिस वाहनाचा क्र. RJ-19-M-5835 व घटना स्थळावर मिळून आलेली दुचाकी मोटरसायकल देखिल ताब्यात घेण्यात आले.

यामध्ये खैर प्रजातीचे नग – ७, घ.मी- ५.१०, किंमत 29,137, टोयोटा क्वालिस वाहन क्र जी.जे.19-एम -5835 तसेच हिरोशेंडा कंपनीची दुचाकी मोटरसायकल सीडी डीलक्स किंमत 70 हजार असे एकूण सुमारे दोन लाख रुपयाची पेक्षा अधिक रकमेचे साहित्य जप्त केले आहे. या गुन्ह्यात तपासणी कामी उपवनसंरक्षक पूर्वभाग बुवार चव्हाण नाशिक चे हेमंत शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!